EV Charging Station
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भद्रकालीत पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेत महावितरण कंपनीकडून इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. महासभेत महापालिकेच्या मालकीची जागा देण्याचा ठराव संमत करण्यात आला. जागेच्या मोबदल्यासंदर्भात महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे.