Prerna Balkawade
sakal
देवळाली कॅम्प: भगूर पालिकेच्या चुरशीत व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेरणा बलकवडे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अनिता विजय करंजकर यांचा १९१३ च्या फरकाने दणदणीत पराभव करून थेट नगराध्यक्षपदाचा मान पटकावला. या निवडणुकीतील विजयामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सत्ता परिवर्तन घडले असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच शिवसेनेचा (उबाठा) पालिकेवर ध्वज फडकला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक ९ नगरसेवक विजयी झाले असले तरीही शिवसेनेला सत्ता शाबूत ठेवण्यात अपयश आले आहे.