Nashik News : मुंडेंच्या बदलीचा रेकॉर्ड मोडत बानाईत रुजू अन् हजर होताच अडथळ्यांची स्पर्धा सुरू!

Bhagyashree Banaitkar taking over as Additional Commissioner from Ashok Atram.
Bhagyashree Banaitkar taking over as Additional Commissioner from Ashok Atram.esakal

नाशिक : एकाच महिन्यात अनेकदा बदली होण्याचा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर भाग्यश्री बानाईत यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा सोमवारी (ता. २) पदभार स्वीकारला. मात्र, येथेही त्यांची अडथळ्यांची स्पर्धा संपली नाही. पदभार स्वीकारल्यानंतर अशोक अत्राम यांनी पदमुक्त होणे अपेक्षित असताना दिवसभर त्यांच्या दालनात बैठका घेऊन बानाईत यांना महापालिकेचा प्रवास सोपा नसल्याचे दाखवून दिले. (bhagyashree banait apponted as additional commissioner of nmc nashik news)

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने मागील आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात भाग्यश्री बानाईत यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली. आयएएस बानाईत यांची सरकारने महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांचा बदल्यांचा विक्रम मोडीत निघाला आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भाग्यश्री बानाईत कार्यरत होत्या. त्यांची बदली विदर्भ वैधानिक विकास महामंडळात सदस्य सचिव म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर आठ दिवसातच नाशिक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

आता पुन्हा नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली. बानाईत यांनी दुपारी पदाचा कार्यभार महापालिकेत स्वीकारला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांच्याकडून पदभार स्वीकारला.'

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Bhagyashree Banaitkar taking over as Additional Commissioner from Ashok Atram.
Dhule News : बॅनरबाजीमुळे होणाऱ्या विद्रूपीकरणाला लागणार ‘ब्रेक’! महापालिकेकडून कारवाई

बैठकांचा धडाका

अत्राम यांनी अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे बानाईत यांच्याकडे सोपविल्यानंतर कामकाज बंद करणे अपेक्षित होते. परंतु दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान अत्राम यांनी बैठकांचा धडाका लावला. काही अधिकाऱ्यांकडून फाइल मागवल्या.

अत्राम यांची आठ महिन्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याने त्यांच्या या भूमिकेवर महापालिका मुख्यालयात विविध चर्चा घडल्या. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामकाज करीत असून यात महापालिका व शासनाचे कुठलेही नुकसान नसल्याचा दावा माजी अतिरिक्त आयुक्त अत्राम यांनी केला, तर पदभार स्वीकारलेल्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी याविषयी बोलणे टाळले.

Bhagyashree Banaitkar taking over as Additional Commissioner from Ashok Atram.
Nashik News: जिल्हयातील 2 ग्रामसेवकांचे निलंबन अन् 4 जणांची चौकशी! ग्रामपंचायत निवडणुकानंतर वाढला रोष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com