Bharat Jodo Yatra : छात्र भारतीचे कार्यकर्ते राहुल गांधींबरोबर 16 KM चालले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief office bearers and workers of Chhatrabharati participated in Bharat Jodo Padayatra from Kalmanuri (District Hingoli).

Bharat Jodo Yatra : छात्र भारतीचे कार्यकर्ते राहुल गांधींबरोबर 16 KM चालले

नाशिक रोड : राज्यातील छात्रभारतीच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कळमनुरी (जि. हिंगोली) येथून भारत जोडो पदयात्रेत सहभाग नोंदवला. या यात्रेत नाशिकचे कार्यकर्ते सोळा किलोमीटर राहुल गांधींबरोबर चालले. नाशिकच्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक अशा भारत जोडो यात्रेचा अनुभव घेतला. (Bharat Jodo Yatra Activists of Chhatra Bharati walked 16 KM with Rahul Gandhi Nashik News)

हेही वाचा: Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; ‘नमामि गोदा’ प्रकल्प रेंगाळतोय कागदावरच

शिक्षणाचे बाजारीकरण शाळा बंद करणे यासह अनेक गोष्टींवर छात्र भारती विद्यार्थी संघटनेने आपले फलक झळकवले होते. फलक पाहून राहुल गांधी यांनी छात्रभारतीच्या स्मिता कसबे व इतर कार्यकर्त्यांना जवळ बोलावून त्यांच्या फलकावरील घोषणांविषयी माहिती घेतली. अनिकेत घुले, स्वाती त्रिभुवन, स्मिता कसबे, प्रशिक सोनवणे यांच्यासोबत नवीन शिक्षण धोरणाच्या विरोधातील छात्रभारती विद्यार्थी संघटनेची भुमिका समजून घेतली.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे म्हणजे बहुजनांच्या हातातून शिक्षण हिसकावून घेणे,असे कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पटवून सांगितले. राहुल गांधी यांनी संसदेत या विषयावर उठवला जाईल असे आश्वासन दिले. छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागूल, कार्यवाह अनिकेत घुले, संघटिका स्वाती त्रिभुवन, राज्य सदस्य देविदास हजारे, गणेश जोंधळे व स्मिता कसबे, तुषार पानसरे, तृप्ती जोर्वेकर, राहुल जऱ्हाड, श्वेता शेटे, स्वप्निल कुंभारकर, प्रशिक सोनवणे, साईराज घुले, निरज इघे, माधुरी घुले, विवेक येळेकर, जितेश कांबळे सहभागी झाले होते.

हेही वाचा: Nashik : देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवाशांचा धोकादायक प्रवास!

टॅग्स :Rahul GandhiNashikYatra