Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी तिने Air Indiaच्या नोकरीवर सोडलं पाणी..

Atisha Paithankar with Rahul Gandhi
Atisha Paithankar with Rahul Gandhiesakal

चांदोरी (जि. नाशिक) : राहुल गांधींनी भारत जोडोच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरुवात केली आहे, यात सोशल मीडियावर राहुल गांधींयांच्या व्हिडीओ फोटो सर्वत्र शेअर होत असताना त्यांच्या या साध्या राहणीकडे तरुणाई आकर्षित झाली आहे, दरम्यान याच भारत जोडो पदयात्रेला नाशिक रोडच्या अतिषा पैठणकर च्या निमित्ताने नाशिक चा हात मिळाला आहे. (Bharat Jodo Yatra atisha paithankar quit Air India job for Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Nashik News)

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालेय.राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जात आहे.

याचदरम्यान,भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील एका तरुणीची सर्वत्र चर्चा होत आहे. आतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव आहे.ही तरुणी नाशिक रोड येथील रहिवाशी आहे. या तरुणीची कथा ही वेगळीच आहे. तिला तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियात नोकरी मिळाली. यानंतर ७ सप्टेंबरला तिच्या नोकरीची होती. मात्र, याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती.

Atisha Paithankar with Rahul Gandhi
Water Crisis in City : धरणात मुबलक, पण नळाला थेंबथेंब पाणी!

नोकरीवर रुजू होण्यासाठी ती ६ सप्टेंबरला कोलकाता येथे जायला निघाली होती. मात्र, मुंबई विमानतळावर आल्यावर तिला नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत ती द्विधा मन:स्थितीत होती. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडले आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही तिला करावा लागला.मात्र, एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. यानंतर आई वडिलांनी दिलेल्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले.

नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्वकांक्षी आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे, असे आतिषा पैठणकर म्हणाली आहे.

Atisha Paithankar with Rahul Gandhi
Nashik : मुंबई नाका चौकात अंडरपास; शहरात 3 चौकात उड्डाणपूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com