देवळा- विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२- जी या मार्गावरील भावडघाट ते गुंजाळनगर रस्त्याच्या पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या काँक्रिटीकरणाला उच्च न्यायालयाकडून सात दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. यात संबंधित भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गाने ताब्यात घ्यायचा आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग कायदा अनुषंगाने नुकसानभरपाई न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कोणतेही संपादन हाती न घेतल्याने उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २८) या कामाला ७ मार्चपर्यंत स्थगिती दिली.