भिवतास धबधब्याने निसर्ग सौंदर्य खुलले

bhivtas waterfall
bhivtas waterfall Sakal

मनखेड (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्याला निर्सगाने भरभरून निर्सग सौंदर्य दिले आहे. त्यापैकीच एक नैसर्गिक देणगी म्हणजेच सुरगाणा तालुक्यातील केळावण - खोकरविहीर सिमेवर असलेला नयनरम्य भिवतास धबधबा. मान्सूनचे आगमन होताच हा धबधबा वाहण्यास सुरवात झाली आहे. परिसराने अतिशय सुंदर आणि मनमोहक रुप धारण केले आहे. (bhivtas waterfall has opened up the beauty of nature in Surgana)

भिवतास धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. अप्रतिम निर्सग सौंदर्याचा आंनद लुटत असतात. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील हा भिवतास धबधबा अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. उंचावरून पडणारे पांढरेशुभ्र पाणी अतिशय मनमोहक दिसते. धबधब्याच्या खालचा परिसरही डोळ्यांचे पारणे फेडतो. तेथील परेटी डोह, हंडाहंडी डोह पर्यटकांना भुरळ घालतात.

परंतु, या आदिवासी भागातील धबधब्याचे दुर्दैव असे की, या परिसराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. दरवर्षी या धबधब्याचे पाणी वाहून जात असते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या अप्रतिम निर्सगाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर सदर परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ होऊन एक सुंदर असे पर्यटन स्थळ होऊन परिसरातील नागरीकांना रोजगार निर्मिती होईल, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

bhivtas waterfall
मानसिक तणावात आसणाऱ्यांचे समुपदेशन; टोल फ्री क्रमांक उपलब्ध

पावसाळा सुरु होताच प्रसिद्ध भिवतास धबधबा पाहण्यासाठी दुरवरून निर्सगप्रेमी व पर्यटक या ठिकाणी येत असतात. परंतु, या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी - सुविधा नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिकाधिक लक्ष देऊन सदर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास कारावा.

- मनोहर जाधव, खोकरविहीर

(bhivtas waterfall has opened up the beauty of nature in Surgana)

bhivtas waterfall
नाशिक- कल्याण लोकलचा विषय बारगळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com