Water Supply Scheme : मालेगावला 51 पाणीपुरवठा योजनांचे आज भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse & Gulabrao Patil

Water Supply Scheme : मालेगावला 51 पाणीपुरवठा योजनांचे आज भूमिपूजन

मालेगाव (जि. नाशिक) : पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मालेगाव तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ५१ गावातील पाणीपुरवठा योजनेच्या ई भूमिपूजन समारंभ शनिवारी (ता.२५) दुपारी एकला होणार आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री श्री. भुसे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत. (Bhoomipujan today for 51 water supply schemes in Malegaon dada bhuse gulabrao patil nashik new)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तालुक्यातील निळगव्हाण, काष्टी, वडेल, अजंग, कोठरे बुद्रुक, कोठरे खुर्द, वडनेर, खाकुर्डी, वळवाडे, विराणे, पोहाणे, टिपे-१ व २, निमशेवडी, कंक्राळे, लुल्ले, गरबड, गाळणे, नागझरी, डोंगराळे, टिंगरी, वजिरखेडे, सायने खुर्द, दहिकुटे, पळासदरे, कंधाणे, कौळाणे (गा.),

घाणेगांव, वनपट, मोहपाडे, आघार बुद्रुक, नांदगांव खुर्द, सावतावाडी, कुकाणे, लेंडाणे, दाभाडी, डाबली, सातमाने, गारेगांव, चिंचवे (गा.), वळवाडी, खडकी, भारदेनगर, भिलकोट, माणके, संवदगांव, चंदनपुरी, दाभाडी १२ गाव, रावळगाव, झोडगे, कजवाडे (रामपुरा), माळमाथा २६ गाव आदी पाणीपुरवठा योजनांचा ई-भूमिपूजन सोहळा मंत्री पाटील यांच्या हस्ते होईल.

पाणीपुरवठा योजनांमुळे सर्व ५१ गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. योजनांमुळे मुबलक पाणी उपलब्ध होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.