
एका २५ वर्षीय महिलेचा भुसावळमध्ये शॉक लागून मृत्यू झाला. मात्र माहेरच्या लोकांनी महिलेच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप केला. भुसावळमधील वांजोळा गावात ही घटना घडलीय. दिपाली तायडे असं मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. पाणी भरताना शॉक लागून तिचा मृत्यू झाला होता. पण माहेरच्या लोकांनी शंका व्यक्त करत सासरच्या लोकांवर आरोप केले आहेत.