रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

सोग्रस (जि. नाशिक) : रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून पत्नी ठार, पती जखमी झाल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. अरुण सुभाष कापसे (वय ४७) आणि पत्नी गीता (वय ४२, रा. कापसे गल्ली, शनी चौक, निफाड) हे दुचाकीने (क्र. एमएच- १५- ईजे- ५६१७) विंचूर- लासलगाव रस्त्याने चांदवडकडे येत होते. वाळकेवाडी फाट्याजवळील आनंद पाईप कंपनीजवळ दुचाकी आदळल्याने गीता कापसे रस्त्यावर पडल्या. त्यात अति रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. अरुण हे देखील गंभीर जखमी झाले. यासंदर्भात दरेगाव (ता. चांदवड) येथील संजय गांगुर्डे यांनी पोलिसांना माहिती दिली. वडनेर भैरव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी जे. टी. मोरे तपास करीत आहे.

हेही वाचा: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेल्या युकांचा दुचाकी अपघातात मृत्यू

Web Title: Bike Accident Due To Potholes On Roads Wife Killed And Husband Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikaccidentdeath
go to top