ही तर क्रूर चेष्टा! झोपडीत राहून मोलमजूरी करणाऱ्या व्यक्तीला चक्क 69 हजार रूपयांचे बील

eSakal (21).jpg
eSakal (21).jpg

पिंपळगावं बसवंत (जि.नाशिक) : वीजवितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पिंपळगांव बसवंत येथे झोपड्डीत राहुन मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला चक्क 69 हजार रूपयांचे बील देण्यात आले आहे. बिलाचा आकडा पाहुन ग्राहकांच्या तोडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे वीज वितरणच्या तुघलघी कारभाराचे पितळ उघडे पडलेआहे.

झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला चक्क 69 हजार रूपयांचे बील
पिंपळगांव बसवंत शहरातील उंबरखेड रस्त्यावरील भाऊ नगर हा कष्टकरी आदीवासी समाज वास्तव्यास आहे.तेथे संतोष तुकाराम जाधव हे आपल्या कुटुबासह झोपडीत राहतात.जाधव हे माथाडी कामगार असुन वीजबील आई पार्वताबाई जाधव यांच्या नावाने येते. त्यांच्या घरात एक ट्युबलाईट,टिव्ही व पंखा आहे.या व्यतीरिक्त कोणतीच वीजेची उपकरणे ते वापत नाहीत.असे असतांना त्यांना वीजवितरण कंनीने मार्च महिन्यात तब्बल 69 हजार रूपये बील दिले आहे.वापर नसतांना एवढे बील कसे असा प्रश्‍न जाधव यांनी संबधीत अधिकार्याना विचारले असता वीज भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

ग्राहकांच्या तोडचे पाणी पळाले
देयक थकल्याने गेली त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाआहे.त्यामुळे जाधव कुटुंब गेली दीडमहिन्यापासुन अंधारातआहे. पूर्वी दर महिन्याला बील सहाशे ते सातशे रूपये यायचे.पण फेब्रुवारी महिन्यात अचानक 62 हजार रूपये बील आले.ते न भरल्याने वीज पुरवठा तोडला.वीज पुरवठा बंद असतांनाही त्या 62 हजार रूपयांत सात हजार रूपयांची भर टाकुन पुन्हा मार्च महिन्यात 69 हजार रूपये बील आलेआहे.लॉकडाऊनमुळे अगोदर उत्पन्न घटले असतांना अवाच्या सव्वा वीज बील पाठवुन महावितरणने जाधव यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.हे बील पाहुन जाधव यांची पाचावरण धारण बसलीआहे.

महावितरणचा भोंगळ कारभार
अगोदर असे बरेच प्रकार समोर आले आहेत.लॉकडाऊन काळात सरासरीपेक्षा वाढीव वीजबील आल्याचे अनेकांच्या तक्रारीआहे.वीजवितरण कंपनीकडुन तक्रारीचा निपटारा समाधानकारक न झाल्याने अनेकांनी वीजबील भरलेनाही.आधीच सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक विवंचनेत आहे. महावितरणच्या अशा भोंगळ कारभाराची परिसरात चर्चा सुरूआहे.वापर नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजबील येणे ही गंभीर बाब असुन वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरजआहे.अन्यथा सामान्य माणुस यात भरडला जाणार आहे.


बाजार समितीती माथाडी कामगार म्हणुन काम करतो.अगोरद 62 हजार रूपये व नंतर वीज खंडीत करून ही 69 हजार रूपये बील आले आहे.याची दाद अधिकार्याकडे मागीतली तर वापर केल्याचे ते सांगतात.मोलमजुरी करणार्या माझ्या कुटुंबात एवढा वापर करण्यासाठी वीजेची उपकरणे नाही.-संतोष जाधव(वीज ग्राहक,पिंपळगावंबसवंत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com