Nashik News : ग्रामसेवकांनाही आता Biometric हजेरीचे बंधन; लटकलेली कामे होणार वेगाने

biometric
biometricesakal

नाशिक : प्रत्येक गावात ग्रामपंचायतीशी निगडित कामासाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची वाट बघावी लागणार नाही, त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही.

ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोज कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना यापुढे बायोमेट्रिक मशिनवर हजेरी लावावी लागणार आहे. या आदेशामुळे शेतकरी, ग्रामस्थांना आता ग्रामसेवकाची भेट घेणे सोपे होणार आहे. (Biometric attendance now mandatory for gram sevak pending work will done quickly Nashik News)

गावांमध्ये सरपंचाप्रमाणे ग्रामसेवक हे पदही महत्त्वाचे आहे; पण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांची ग्रामपंचायतीमधील कामे प्रलंबित राहतात, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटत नाही. ग्रामसेवक गावात येत नाही, भेटत नाही अशी मोठी ओरड ग्रामीण भागातील नागरिकांची होती. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. कामे वेळेवर होत नाही.

याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. ग्रामसेवकासह ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, आरोग्य खात्यातील कर्मचारी, पशुवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वेळेत कधीच उपस्थित नसल्याचे याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ग्रामसेवक, तलाठी यांच्यासाठी बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर शासनाने याबाबत निर्णय घेतला असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू झाल्याने कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने तसे आदेश जिल्हा परिषद स्तरावर दिले आहेत.

biometric
Satyajeet Tambe | ऋणानुबंध कायमच राहण्यासाठी गावभेटी : सत्यजित तांबे

...आदेशाबाबत संभ्रम

ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याची मागणी झाल्यानंतर, त्यावर मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांनी तपासून प्रस्ताव सादर करावा असा अभिप्राय दिला. त्यानंतर ग्रामविकास विभागाने ५ जानेवारी रोजी सर्व विभागीय आयुक्तांना पत्र देत उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदांकडून तत्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना दिल्या.

परंतु केवळ कार्यवाही करावी म्हणजे काय? यासंदर्भात सविस्तर बाबी पत्रात नमूद नाहीत. बायोमेट्रिक यंत्रणा बसवायची तर ते यंत्र खरेदी कोण करणार, त्याचा खर्च किती, तो कोण देणार? याचा कोणताही उल्लेख त्या पत्रात नाही.

त्यामुळे जिल्हा परिषदांनी या पत्राचा अर्थ काय लावायचा, हाही प्रश्नच आहे. जिल्ह्यात १३८२ ग्रामपंचायती असून त्यांना बायोमेट्रीक मशिन बसवयाची का? ग्रुप ग्रामपंचायती आहे, काही ग्रामपंचायतींमध्ये वीज पुरवठा नाही तेथे काय करायचे आदी प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

biometric
Nana Patole Press Conference | भाजपचेही घर लवकरच फुटेल : नाना पटोले

ग्रामविकासाला होणार हे फायदे

- बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केल्यास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना गावात येणे सक्तीची राहणार आहे.

- हजेरीसाठी गावात आल्यावर, ग्रामपंचायतींत उपस्थिती वाढणार. पर्यायाने ग्रामस्थांची कामे वेगाने होणार.

- ग्रामपंचायत कार्यालय केव्हाही उघडते व केव्हाही बंद केले जाते. कधी कधी तर, ग्रामसेवक नाहीत, या सबबीखाली कार्यालय उघडलेच जात नाही. मात्र आता हे प्रकार बंद होतील.

- वरच्या साहेबांनी बोलावले आहे,' असे सांगून ग्रामसेवक निघून जातात, गावाच्या जिल्हा परिषदेत जायचे आहे, पंचायत समितीत काम आहे अशी ग्रामसेवकांची कारणे बंद होऊन ग्रामस्थांची कामे होतील.

- ग्रामसेवकांच्या हजेरीने ग्रामविकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

biometric
Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आतापासूनच सतर्क!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com