Nana Patole Press Conference | भाजपचेही घर लवकरच फुटेल : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana patole

Nana Patole Press Conference | भाजपचेही घर लवकरच फुटेल : नाना पटोले

नाशिक : भारतीय जनता पक्षाचेही घर लवकरच फुटेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करताना १४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे सरकार पडेल असा दावा केला. (Nana Patole Press Conference statement criticised BJP nashik news)

नाशिक दौऱ्यावर आलेल्या श्री. पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार आहे. भाजपने कटकारस्थान रचल्याचे दुःख आहे.

मात्र दुसऱ्यांचे घर फोडून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपचे घर लवकरच फुटेल, असा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई व बेरोजगारी यावरून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या अटकेचा बहाणा करत आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : पुन्हा शिंदे फडणवीसांची दिल्ली वारी; शहां बरोबर खलबतं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतदान मागणाऱ्या भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर जागा दाखवू

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समज दिली. काँग्रेस पक्षाला बाहेरच्या लोकांच्या सल्ल्याची गरज नाही. उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या युती बद्दल पटोले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेस या आघाडीत सहभागी होईल की नाही यासंदर्भात प्रस्ताव बघितल्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Maharashtra Politics: शिंदे फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार? शपथविधी गोंधळाची धक्कादायक माहिती उघड