Biopic on Dattu Bhoknal : रोइंगपटू दत्तूच्या जीवनावर कॅनडात चित्रपट! नाशिककरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

dattu bhoknal at Rowing Academy
dattu bhoknal at Rowing Academyesakal

नाशिक : महिला कुस्तीपटूंच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ असेल किंवा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरील चित्रपट यशस्वी झालेले असताना नाशिकमधील आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ यांच्या आयुष्यातील संघर्षकथेवर कॅनडात चित्रपट निर्माण करण्यात येणार आहे.

तेथील पाच जणांच्या टीमने नुकतेच नाशिकमध्ये भोकनळ यांच्या ॲकॅडमीला व चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावाला भेट देवून संपूर्ण माहिती संकलित केली. (Biopic on rower Dattu Bhoknal life in Canada nashik news)

अत्यंत गरिबीतून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेला दत्तू भोकनळ यांनी नाशिकचे नाव अटकेपार पोचवले. २०१० मध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालय, तळेगाव रोही येथे दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१२ त्यांनी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. सैन्यदलात भरती होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

परंतु, हे दु:ख पचवत त्यांनी जिद्द व धावण्याचा सराव कायम ठेवला. २०१३ मध्ये पुणे येथे इंटर सेंटर स्पर्धेत भाग घेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर भोकनळ यांनी मागे फिरून बघितलेच नाही. २०१४ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. इंडिया कॅम्पमध्ये त्यांची निवड झाली.

२०१६ च्या आॉलिंपिक पात्रता फेरीत सुवर्णपदक मिळवले; परंतु, याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांची आई आशाबाई भोकनळ यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच २०१७ मध्ये दत्तू भोकनळ यांना महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्यांनी आपले अवघे आयुष्य आपल्या मुलासाठी खर्ची घातले, असे आई आशाबाई व वडील बबन भोकनळ हे दोघेही अकाली सोडून गेल्याचे दु:ख सांगताना दत्तूच्या डोळ्यात अश्रू तरळतात.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

dattu bhoknal at Rowing Academy
Entertainment : शूट धमाल, मैत्री बेमिसाल! हे मोठे बॉलिवूड स्टार आता एकाच पडद्यावर

या संपूर्ण संघर्ष कथेवर कॅनडा येथील प्रोड्यूसर मेल डिसूजा यांनी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशिर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅनडाच्या टीमने ऑगस्ट २०२२ मध्ये नाशिकला प्रत्यक्ष भेट दिली. पाच लोकांच्या या टीमने दिवसभरात दत्तूच्या जीवनात घडलेल्या गोष्टी जाणून घेतल्या. शेतात सगळी चर्चा केली. २०२४ मध्ये हा चित्रपट पूर्ण होणार आहे.

...तर 'दत्तू’च होईल हिरो

दत्तू भोकनळ यांच्याशी साधर्म असलेल्या हिरोचा सध्या शोध घेतला जात आहे. तसा हिरो न मिळाल्यास दत्तू भोकनळ यांनाच स्वत:च्या चित्रपटात हिरो होण्याची संधी मिळू शकते.

"माझ्या आयुष्यावर चित्रपट निर्माण करण्याची तयारी कॅनडातील टीमने दाखवली आहे. त्यांनी प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली. २०२४ पर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यांसदर्भात आम्ही करारदेखील केला आहे."

- दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय रोइंगपटू, नाशिक

dattu bhoknal at Rowing Academy
Entertainment Tax : करवसुलीची ‘करमणूक’! सहा मल्टिप्लेक्स मालकांना दिलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com