Entertainment : शूट धमाल, मैत्री बेमिसाल! हे मोठे बॉलिवूड स्टार आता एकाच पडद्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Entertainment news

Entertainment : शूट धमाल, मैत्री बेमिसाल! हे मोठे बॉलिवूड स्टार आता एकाच पडद्यावर

Entertainment : विवेक चौहानच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल एकत्र दिसणार आहेत. ॲक्शन ड्रामा अशा जाॅनरचा हा चित्रपट आहे; या चित्रपटाचे नाव अजून माहिती नसले तरी याचा फर्स्ट लूक रिलीज केल्याकेल्या सगळीकडेच त्याची चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटात सनी देओलशिवाय 80 आणि 90 च्या दशकातील सुपरस्टार जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा: Entertainment: अर्ध्यातून सोडला या टीव्ही कलाकारांनी शो पण डिमांड अशी की चाहत्यांनी...

या चारही कलाकारांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले असून आता बऱ्याच काळानंतर ते एकाच चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.या अँक्शन थ्रिलर चित्रपटाचे पोस्टर समोर येताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या सर्व दिग्गजांना एकत्र पाहिल्यावर पुन्हा एकदा ९० चे दशक परत आल्यासारखे वाटते. मात्र, या चित्रपटाचे नाव काय असेल, हे अद्याप ठरलेले नाही.

हेही वाचा: Entertainment Updates : रसिका एकटी असल्यामूळे पडली का यांच्या प्रेमात ? | Sakal Media |

चित्रपटाचे पोस्टर चार कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. फर्स्ट लुक शेअर करताना संजय दत्तने लिहिले की, “सर्व चित्रपटांचा बाप. धमाल शूट, दोस्ती बेजोड." पोस्टरमध्ये चारही कलाकार कॅमेऱ्यासमोर जबरदस्त लूक देताना दिसत आहेत. मिथुन चक्रवर्तीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने हाफ स्लीव्ह लेदर जॅकेट घातलेले दिसते. डोक्यावर कॅप, कपाळावर टिळा आणि गळ्यात मफलर आहे.

हेही वाचा: Entertainment Special News : कोण आहे श्रेयस तळपदेच्या ख-या आयुष्यातील परी ? | Sakal Media |

इन्स्टाग्रामवर पोस्ट

जॅकी श्रॉफ (@apnabhidu) ने शेअर केलेली पोस्ट

दुसरीकडे, सनी देओलने केशरी आणि पांढरा कैदी ड्रेस परिधान केला आहे. त्याचे लांब केस असून कपाळावर पांढरी पट्टी दिसते. तिसरा लूक संजय दत्तचा आहे. हा अभिनेता तपकिरी रंगाचे जाकीट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. आणि जर आपण जॅकी श्रॉफबद्दल बोललो, तर अभिनेत्याच्या गळ्यात स्कार्फ आहे, जो खूपच नेत्रदीपक दिसत आहे.

हेही वाचा: Entertainment Special Show : ईशानी आठल्ये अडकणार लग्न बंधनात ; पाहा व्हिडीओ

हे पोस्टर शेअर करताना जॅकी श्रॉफ यांनी लिहिले की, शूट धमाल, दोस्ती बेमिसाल. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक चौहान करत आहेत आणि अहमद खान, शायरा अहमद खान आणि झी स्टुडिओ मिळून याची निर्मिती करणार आहेत.