Nashik Police
sakal
नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत खासगी कंपनीमार्फत (बाह्यस्रोत) कंत्राटी भरती विरोधात तब्बल पाच महिन्यांपासून सुरू असलेले ‘बिऱ्हाड आंदोलन’ अखेर रविवारी (ता. ७) संपले. आंदोलकांनी ‘बिऱ्हाड’ मागे घेत असल्याचे पत्र पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिल्यावर रस्त्यावरील पाल, बॅरिकेड्स काढून वाहतुकीला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांसह पोलिसांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. तब्बल १५० दिवसांनंतर रस्ता मोकळा झाला आहे.