नाशिक- आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी शिक्षकांना काढून बाह्यस्रोतांद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याच्या विरोधात आदिवासी रोजंदारी शिक्षकांनी सुरू केलेल्या ‘बिऱ्हाड आंदोलना’ला रविवारी (ता. १३) तब्बल १२० तास पूर्ण झाले आहेत. मंत्र्यांशी झालेली चर्चाही निष्फळ ठरली असून, आदिवासी आयुक्तालयासमोरच आम्हाला लेखी द्या, आम्ही मुंबईत येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पेच वाढला आहे. आदिवासी आयुक्तालयाचे कामकाज आंदोलनामुळे प्रभावित झाले असून, सोमवारी (ता. १४) अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होईल.