esakal | आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मालेगावला भाजपचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मालेगावला भाजपचा आक्रोश

आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मालेगावला भाजपचा आक्रोश

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : विधानसभा अधिवेशनातील गदारोळानंतर राज्यात चर्चेचा विषय झालेल्या भाजपच्या बारा आमदारांना वर्षासाठी विधानसभेचे प्रभारी सभापती भास्कर जाधव यांनी निलंबन केल्याच्या निषेधार्थ येथील भाजप व मालेगाव युवा मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने, आक्रोश करीत आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला. (BJP agitation in Malegaon to protest against the suspension of 12 MLA in assembly)


भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निवेदन दिले. अधिवेशन कामकाज सत्रात ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी आक्रमकपणे मांडली. सरकारने सुड भावनेने भाजपच्या बारा आमदारांचे निलबंन केले. हे निलबंन लोकशाहीवर घातलेला घाला आहे. न्याय हक्कासाठी विधानभवनात लोकप्रतिनिधींनी उठवलेला आवाज हा जनतेचा आवाज आहे. तो दाबण्याचे पाप या तिघाडी सरकारने केल्याची टीकानिकम यांनी केली.

निवेदनात १२ आमदारांची झालेली निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, नंदूतात्या सोयगावकर, देवा पाटील, संजय काळे, सुधीर जाधव, सतीश उपाध्ये, सुनील शेलार, राहुल पाटील, कुणाल सूर्यवंशी, श्याम गांगुर्डे, धनंजय पवार, पप्पू पाटील, शक्ती सौदे, निखिल सोनार, स्वप्नील भदाणे, योगेश ठाकरे, विशाल नेरकर, भूषण शिंदे आदी सहभागी झाले होते.


(BJP agitation in Malegaon to protest against the suspension of 12 MLA in assembly)

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

loading image