Nashik Political News | राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : सांगळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials of Congress Committee giving a statement to Tehsildar Eknath Bangale on behalf of Taluka Congress.

Nashik Political News | राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : सांगळे

सिन्नर (जि. नाशिक) : राहुल गांधी यांचे ज्याप्रकारे निलंबन करण्यात आले, ते नियमबाह्य असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दुर्दैवी आणि बेकायदेशीर असा निर्णय आहे. त्यामुळे सिन्नर तालुका कॉंग्रेसतर्फे भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे सांगत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. (BJP Attempts to suppress Rahul Gandhi voice vinayak sangle Nashik Political News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व भाजपचा सिन्नर तालुका कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. धरणे आंदोलनानंतर तहसीलदार एकनाथ बंगाळे यांना निवेदन देण्यात आले.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव दिनेश चोथवे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष जाकिर शेख, तालुका समन्वयक उदय जाधव, मिडीया सेलचे तालुकाध्यक्ष अश्पाक शेख, तृषांत येलमामे, ज्ञानेश्वर पवार, विशाल परदेशी, ज्ञानेश्वर लोखंडे आदी उपस्थित होते.

निर्णय लोकशाहीला मारक

गुजरात येथील न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावनीत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. भाजपचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून लोकशाहीला मारक ठरू शकतो, असे सांगळे यांनी सांगितले. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.