Nashik BJP News : भाजप शहराध्यक्ष बदलाचा निर्णय लांबणीवर; एकमत होत नसल्याचा परिणाम | BJP city president change decision delayed Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

Nashik BJP News : भाजप शहराध्यक्ष बदलाचा निर्णय लांबणीवर; एकमत होत नसल्याचा परिणाम

Nashik BJP News : राज्यात अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने महिनाभर नवीन भाजप शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती लांबणीवर पडली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर जिल्हा व शहर पातळीवरदेखील बदल होतात. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती केल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (BJP city president change decision delayed Nashik News)

गुरुवारी (ता. २) राज्यातील ६८ शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष या पदासाठी नावावर एकमत होत नसल्याने नियुक्त लांबणीवर पडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नववर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या योजना ८० कोटी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून जनसंपर्क अभियान पूर्ण झाल्यानंतर नियुक्त जाहीर होणार असल्याचे समजते.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी व नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोदी सरकारच्या कार्यकाळातील नऊ वर्षात सुमारे ४८ कोटी लोकांची जनधन खाती उघडण्यात आली. उज्ज्वला योजनेअंतर्गत ९ कोटी पाच लाख गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. जवळपास साडेतीन कोटी घरांना वीजपुरवठा व ११ कोटींहून अधिक शौचालयांची बांधकाम करण्यात आले.

दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यात आला. साडेबारा कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला. या सर्व योजना देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या असून, सबका साथ, सबका विकास हा नवा अध्याय असल्याचा दावा करताना केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचण्यासाठी या योजनेचा शुभारंभ होईल. भाजपच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. २) दुपारी तीन वाजता योजनेचा शुभारंभ होईल.

टॅग्स :BjpNarendra ModiNashik