Girish Mahajan
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या भूमिपूजनासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकमध्ये आगमन होण्याच्या एक तासापूर्वीच भाजपने काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पाडले. चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह माजी उपमहापौर गुरमितसिंग बग्गा व मनसेच्या माजी गटनेत्या नंदिनी बोडके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नरेश पाटील, नीलम पाटील यांच्या प्रवेशाने काँग्रेसमध्ये बोटावर मोजण्याइतके नेते शिल्लक राहिल्याची भावना भाजप कार्यालयात व्यक्त करण्यात आली.