भुजबळांनी नाशिक शहरासाठी किती निधी आणला? गिरीश महाजनांचे थेट आव्हान

नाशिक महापालिकेच्या मुद्द्यावरून भाजपचे गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिले आहे.
girish mahajan
girish mahajan esakal

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सहा नगरसेवक असल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महापालिकेत जाता आले नाही, परंतु आता प्रशासकीय राजवट आल्याने महापालिकेत जाऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला. त्यात हे थांबवा, ते थांबवा हा राज्याच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ते महापालिकेत राबवत आहे. परंतु भुजबळांना याचे उत्तर नाशिककर महापालिकेच्या निवडणुकीत देतील. पूर्वीपेक्षा अधिक भाजपचे (BJP) नगरसेवक निवडून येतील असा दावा माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी करताना भुजबळांनी पालकमंत्री या नात्याने राज्य सरकारकडून अडीच वर्षात किती निधी आणून दिला हे सांगावे असे आव्हान महाजन यांनी देत शहर राजकारणात भुजबळांविरोधात दंड थोपटले.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. काही कामांना स्थगिती देण्याबरोबरच सध्या सुरू असलेल्या कामावरून कानपिचक्या त्यांनी दिल्या. या पार्श्‍वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले. ते म्हणाले, सहाच नगरसेवक असल्याने भुजबळांना महापालिकेत जाता आले नाही. त्यामुळे आता प्रशासक राजवट आल्याने ते महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयटी पार्कचे काम थांबविण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी ही बाब योग्य नाही. पाच वर्षात चांगली कामे झाली. मेट्रो निओ, नमामि गोदा प्रकल्प, समृद्धी महामार्ग असेल किंवा बससेवा सुरू करण्याचा विषय असेल चांगले विषय हाताळल्याने नाशिककर मतपेटीतून उत्तर देतील. भाजपच्या सत्ताकाळात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेला निधी प्राप्त झाला. अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असल्याने भुजबळांनी नाशिकला किती निधी मिळवून दिला याचे उत्तर द्यावे, असे आव्हानच महाजन यांनी भुजबळांना दिले.

girish mahajan
राज ठाकरेंच्या नव्या इनिंगमध्ये नाशिकच्या कार्यकर्त्यांची घालमेल

सत्तेसाठी शिवसेनेकडून हिंदुत्वाची आहुती

सत्तेसाठी शिवसेना (Shivsena) कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकते. हिंदुत्वाची आहुती देण्यात आली, हेच मोठे उदाहरण आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या व्हायरल व्हिडियोवर शिवसेनेने कारवाई करून धर्मनिष्ठा दाखविण्याचे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. राज्याचे सामाजिक वातावरण खराब करण्याचा भाजपचा अजिबात हेतू नाही. परंतु, राज्याची परिस्थिती इतकी बिकट बनली आहे हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावा की नाही याचा निर्णय राज्यपाल घेतील. भोंग्याच्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी बैठक बोलाविली, परंतु मुख्यमंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही भाजपची भूमिका आहे. परंतु, मुख्यमंत्री या प्रश्‍नाबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्री सहकुटुंब आजीबाईंना भेटण्यासाठी जातात, परंतु बैठकीला जात नाही. यावरून सरकार या प्रश्‍नावर किती गंभीर आहे, हे लक्षात येते.

महाजन म्हणाले

- भोंग्याबाबत सरकारने सर्वसमावेशक निर्णय घ्यावा.
- मनसे- भाजप युतीबाबत सध्या कुठलीही चर्चा नाही.
- राजकारणात भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही.
- मिटकरी यांच्या जिभेला हाड नाही
- शरद पवारांनी त्यांना कानमंत्र दिला पाहिजे.
- सोमय्या यांची जखम महत्त्वाची नाही, पोलिसांकडून दखल नाही हे महत्त्वाचे.

girish mahajan
राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज नाही; उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

''विकासकामांच्या जोरावर नाशिक महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता येईलच, परंतु मागच्या पेक्षा अधिक संख्येने नगरसेवक निवडून येतील.'' - गिरीश महाजन, भाजपचे प्रभारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com