राज ठाकरेंच्या नव्या इनिंगमध्ये नाशिकच्या कार्यकर्त्यांची घालमेल

मनसेला नाशिकमधून मोठी साथ मिळाली असताना राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र राज ठाकरेंनी नाशिकला तळाला टाकले आहे.
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackerayesakal

नाशिक : पक्षाची स्थापना झाल्यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकारणाच्या दुसऱ्या फेजमधील नव्या इनिंगमध्ये नवा मुद्दा घेऊन राज्यभरात झंझावात सुरू झाला असला तरी कधी काळी मनसेला भरभरून देवूनही राज ठाकरे यांनी दुसऱ्या फेजमधील यादीत नाशिकला तळाला ठेवल्याने कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. त्यातही पक्षाची सूत्रे तळागाळापर्यंत काहीही संबंध नसलेल्या नेत्यांच्या हातीच असल्याने पक्षात काय चाललंय याबाबतची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत सविस्तर पोचत नसल्याने वातावरण निर्मितीचा पक्षाला लाभ होत नसल्याची तक्रार करण्यात आल्याचे समजते. (Nashik MNS workers)

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमुळे मनसैनिकांमध्ये चैतन्य पण...

2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर मनसेने राज्यात राडा केला. या राड्याने मराठी मते एकवटली. त्यानंतर टोल नाक्यांच्या मुद्दा घेतला. सुरवातीला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचा गवगवा करत विकासाचे नवे मॉडेल आणले. त्यानंतर केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ तून टार्गेट केले. भूमिकांच्या अदलाबदली नंतर आता हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे यांनी घेत नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे. मशिदीवरील भोंगे उतरविले न गेल्यास मनसेकडून हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे जून महिन्यात अयोध्या (Ayodhya) दौरा करण्याची घोषणा त्यांनी केली. त्या अनुषंगाने ‘राजतिलक की करो तैय्यारी.. आ रहे है भगवाधारी’ ही गाण्याची ट्यून सध्या वाजत आहे. राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे मनसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेनेची जागा भरून काढण्यासाठी पक्ष सज्ज झाल्याचे मनसैनिक मानत आहे. त्यासाठी राज ठाकरे राज्यभरात सभा घेत आहे. परंतु ठाकरेंच्या नव्या इनिंगमध्ये राज्यातील महत्त्वाची शहरे येत असताना नाशिक तळाला गेल्याने मनसैनिकांची घालमेल वाढली आहे.

MNS Raj Thackeray
मनसे-भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर? आदित्य ठाकरेही अयोध्येला जाणार

नाशिकने साथ देवूनही फारकत

मनसेची स्थापना झाल्यानंतर २००७ मध्ये महापालिकेत मनसेचे बारा नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात बारा आमदार निवडून आले. त्यात नाशिक शहरातील तीन आमदारांचा समावेश होता. जिल्हा परिषदेतही चार सदस्य व पंचायत समित्यांमध्ये सभापती मनसेचे निवडून आले. २०१२ मध्ये महापालिकेत चाळीस नगरसेवक निवडून आले. पाच वर्षे सत्ता आल्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत पक्षाला घरघर लागली. पाचपर्यंत नगरसेवकांची संख्या घटली. नाशिककरांनी विकासाला साथ दिली नाही. मोठ्या प्रमाणात कामे करूनही मनसेला सत्ता दिली नसल्याची खंत जाहीर सभांमधून राज ठाकरे व्यक्त करत आहेत. मनसेला नाशिकमधून मोठी साथ मिळाली असताना राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र राज ठाकरेंनी नाशिकला तळाला टाकले आहे. मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भात घुसतील. पुढे पश्‍चिम महाराष्ट्रातही सभा घेतील. परंतु, अद्यापपर्यंत नाशिकचे नियोजन नसल्याने ही घालमेल वाढल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलत आहेत.

MNS Raj Thackeray
'तात्या विंचू', धनंजय मुंडेंचा 'मनसे' समाचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com