Nashik Municipal Corporation : भाजपमध्ये सभागृहनेते पदासाठी 'काटे की टक्कर'; निष्ठावंत विरुद्ध आयाराम असा रंगला पेच!

BJP Faces Internal Competition for House Leader Post : नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर चर्चेत असलेले भाजपचे इच्छुक उमेदवार. सभागृहनेते पदासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याच्या शक्यतेमुळे पक्षात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Municipal Corporation

Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वात महत्त्वाच्या अशा सभागृहनेते पदासाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. माजी उपमहापौर गुरमित बग्गा, माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील व स्थायी समितीचे माजी सभापती शाहु खैरे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, स्पर्धेतील चारही नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने त्यातून निष्ठावंतांमध्ये नाराजी नाट्याचा स्फोट होण्याचीदेखील भीती असल्याने या पदासाठी नावे जाहीर करताना ताकही फुंकून पिण्याची वेळ वरिष्ठांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com