Nashik Political News : मनपाच्या ‘बाकड्या’ वरून लोकप्रतिनिधी ‘वाकड्या’त! पंचवटीतील ‘त्या’ गोष्टींची चर्चा

bjp
bjpesakal

पंचवटी (जि. नाशिक) : पंचवटी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. याच पंचवटीत आपला गड शाबूत ठेवणारे भाजपचे दोन माजी नगरसेवक महापालिकेच्या ‘बाकड्या’ वरून एकमेकांत ‘वाकड्या’ त शिरल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

यातून पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे उभयंत्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. (bjp leader in panchavati internal clashes over nmc terms nashik political news)

मागील पंचवार्षिकमध्ये पंचवटीत भाजपने चोवीस पैकी १९ जागा संपादित करून आपली ताकद दाखवून दिली होती. उर्वरित २ मनसे, १ शिवसेना, २ अपक्ष असे संख्याबळ होते. पंचवटीत सलग चार ते पाच टर्म भाजपचेच लोकप्रतिनिधी निवडून येणारा ‘एक’ प्रभाग आहे. यास भाजपचा गडदेखील मानले जाते.

गेल्या निवडणुकीत या प्रभागात चारही नगरसेवक भाजपचेच निवडून आलेले आहेत. सर्वच कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावणाऱ्या या चारही नगरसेवकांमध्ये अलीकडे दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की काय यापैकी एका महिला नगरसेविकेने तर पक्षच बदलून घेतला आहे.

उर्वरित तिघांमध्येही अधूनमधून अंतर्गत खटके उडताना दिसत आहेत. प्रभागात नुकतीच एक अशी घटना घडली की, यामुळे जनमानसात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तो विषय असा की, दिंडोरी रोडवर नगरसेवक निधीतून मनपाने जागोजागी बाकडे बसविले होते. या बाकड्यावर काही ज्येष्ठ नागरिक सायंकाळी बसून गप्पा मारतात.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

bjp
Sanjay Raut Press Conference | काहीही झाले, तरी आमचे नेते उद्धव ठाकरेच : संजय राऊत

परंतु याच भागात राहणाऱ्या एक माजी ज्येष्ठ नगरसेवकाच्या निकटवर्तीय दुकानदाराने बाकड्यावर बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात तक्रार केली. याची तातडीने दखल घेत माजी ज्येष्ठ नगरसेवकांनी सदर बाकडे काढून टाकले.

दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिक बसण्यासाठी आले असता बाकडे गायब दिसले. हा प्रकार ज्येष्ठ नागरिकांनी दुसऱ्या माजी नगरसेवकांकडे कथन केला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी स्वखर्चातून बाकडे बसवून दिले. मात्र, हा विषय प्रभागातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

बालेकिल्ल्यात धुसफूस चव्हाट्यावर

या प्रभागातील माजी लोकप्रतिनिधींमध्ये सध्या कायम राजकीय घमासान सुरू असते. मग ते कधी बॅनरबाजीतून असो की कार्यक्रम पत्रिकेतून असो. हेतुपुरस्सर सहकारी लोकप्रतिनिधींचे नाव न छापणे, प्रभागात होणाऱ्या विविध कार्यक्रम पत्रिकांमध्ये नाव न घेणे. असे अनेक प्रकार अलीकडे घडले असून, यातून अंतर्गत वाद पुढे आला आहे.

bjp
MBA-CET Exam : एमबीए-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com