नाशिक- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजप महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. श्रमिक सेनेचे सुनील बागूल यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसचे गटनेते शाहू खैरे, स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण व माजी महापौर ॲड. यतीन वाघ हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. परंतु, खैरे, चव्हाण व वाघ या तिघांनीही या केवळ अफवा असल्याचे सांगताना अशा चर्चा भाजपमधून पसरविल्या जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.