Nashik : पालकमंत्र्यांवर BJP नेत्यांचा वॉच; शिंदे गट- भाजपमध्ये वाढती दरी

NMC Meeting
NMC Meetingesakal

नाशिक : बाळासाहेबांचे शिवसेना अर्थात शिंदे गट व भाजपचे राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी दोन्हींमध्ये एकमेकांना वरचढ होऊ न देण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या महापालिकेसंदर्भातील प्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीत भाजप आमदारांच्या नातेवाइकांसह शहराध्यक्ष उपस्थित राहिल्याने शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपकडून वॉच ठेवला जात असल्याची खदखद व्यक्त केली जात आहे. (BJP Leader Watch on Guardian Minister dada bhusein NMC meeting nashik Latest Marathi News)

जून महिन्यात महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत मोठे फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. भाजप व शिंदे गटाचा संसार जेमतेम चार महिन्यांपासून सुरू झाला असताना आता राज्याच्या राजकारणात शिंदे गट व भाजप दोन्हींमध्ये मोठे होण्याची चढाओढ लागली आहे. त्याचा प्रत्येक पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यापासून नाशिकमध्ये येत आहे.

पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेत पहिली बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत काही आमदार उपस्थित राहिले, तर नियोजन भवनमध्ये झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे पदाधिकारी व आमदारांचे नातेवाईक उपस्थित राहिल्याने बैठक लोकप्रतिनिधींची की राजकीय पदाधिकाऱ्यांची यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. महापालिका मुख्यालयात गुरुवारी दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

NMC Meeting
Nashik Crime News : नगरसेविका पुत्राकडून उकळली खंडणी; 5 जणांवर गुन्हा दाखल

शिंदे गटावर मागच्या बैठकीत झालेली टीका लक्षात घेता एकही पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिला नाही. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य तसेच भाजपचा एक प्रवक्ता बैठकीत उपस्थित राहिल्याने शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा वॉच असल्याची प्रतिक्रिया बाहेर बसलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावरून नाशिकमध्ये शिंदे गट व भाजपमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

बैठक हायजॅक करण्याचा प्रयत्न

पालकमंत्री दादा भुसे यांचे अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना भाजपच्या आमदारांनी हस्तक्षेप करत बैठकीचे सर्व सूत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. यावरूनही शिंदे गटात भाजप आमदारांबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या प्रश्‍नासंदर्भात आपण उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ असे एका आमदाराने उर्वरित दोन आमदारांना खासगीत निरोप दिल्याने शिंदे गट व भाजपमधील दरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

NMC Meeting
Nashik : पवन नगरला शॉर्ट सर्किट; लाखोंचं नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com