esakal | पाच राज्यातील विधानसभा निकालांचे भाजप, डावे, काँग्रेसकडून स्वागत

बोलून बातमी शोधा

Assembly Election Results
पाच राज्यातील विधानसभा निकालांचे भाजप, डावे, काँग्रेसकडून स्वागत
sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : पाच राज्यातील निवडणुकांचे निवडणूक निकालांचा कल दुपारीच स्पष्ट झाल्यावर भाजप, काँग्रेस, डावे पक्ष यांनी अपेक्षित निकाल असल्याचे म्हटले आहे. पंढपूर-मंगळवेढा पोटनिडवणुकीत भाजपने मुसंडी मारल्याबद्धल भाजपने हा राज्यातील सत्ताधा-यांच्या अराजकते कौल असल्याचे म्हटले आहे.

साधुसंतांचा शाप भोवला : लक्ष्मण सावजी

पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील कौल हा पालघरमधील साधुसंताच्या हत्येचा शाप आहे. राज्यातील सरकार ज्या पद्धतीने कामकाज करत तसेच भ्रष्टाचार, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधातील कौल असून राज्य सरकारने त्याचे आत्मपरिक्षण करावे. दुसरी गोष्ट ईव्हीएमबद्दल सतत ओरड करणा-या तृणमूलने आता याविषयीही बोलावे. बंगालमध्ये भाजपने तीन जागांवरून घेतलेली झेपही आगामी राजकरण दर्शविते.

- लक्ष्मण सावजी, प्रवक्ते, भाजप

हेही वाचा: झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि विजयी झाल्या - छगन भुजबळ

अपेक्षित निकाल : शरद आहेर

पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींचे सरकार येणे आवश्‍यक होते. काँग्रेसला केरळ, आसाममध्ये विशेष यश मिळाले नाही, परंतु भविष्यात काँग्रेस पक्ष जनतेसमोर अधिकाधिक चांगले काम ठेवण्याचा प्रयत्न करेल. देशातील सर्वच निकाल अपेक्षित असेच होते.

- शरद आहेर, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस पक्ष

भाजपला किंमत मोजावी लागली

देशाच्या सर्वच भागात करोनाने थैमान घातलेले असताना भाजपने ज्या पद्धतीने प्रचार केला, त्याची मोठी किमत भाजपला मोजावी लागली केरळमधील डाव्या आघाडीचा विजय एेतिहासिक आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, हा संदेश मतदारांनी भाजपला दिला आहे.

- काॅ. राजू देसले, सदस्य,

भाकप राज्य सचिव मंडळ

हेही वाचा: ममता दिदी राज्यांच्या स्वायत्ततेचा आवाज बनतील! - राज ठाकरे

हा कौल भाजपला नसून परिचरांना

आसाम, पाँडिचेरीतील विजय सोडल्यास इतर तीन ठिकाणी भाजपला मोठा फटका बसला आहे. पश्‍चिम बंगालमधील निकाल अपेक्षितच आहे. दुसरीकडे राज्यातील पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत कल भाजपला नसून माजी आमदार सुधाकर परिचरांना आहे. या निवडनिवडणुकीत त्यांनी आपली ताकद भाजपमागे उभी केली नसतीतर भाजप पन्नास हजारांपेक्षाही कमी मते मिळाली असती. थोडक्यात हा भाजडपला कौल नसून माजी आमदार सुधाकर परिचरांना आहे, त्यामुळे भाजपने हुरळून जाऊ नये.

- कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्टवादी काँग्रेस पक्ष