Devendra Fadnavis
sakal
नाशिक: शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी शासनाने लवकरात लवकर निधी देवून कामे सुरु करावी अशी मागणी शहरातील भाजपच्या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी (ता.३०) भेटून केली. परंतु, या भेटी मागे कुंभमेळ्याचे कारण दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी थेट आमदारांपर्यंत येत असल्याने त्यांना देखील बंदोबस्त पुरविण्याची आलेली वेळ, सिंहस्थ कामांमध्ये आमदारांना विश्वासात न घेताच परस्पर दिली जात असलेली कामे व परजिल्ह्यातील आमदारांचा वाढता हस्तक्षेपाच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते.