esakal | PHOTO : आमदार निलंबनाचा नाशिकमध्ये निषेध; भाजप कार्यकर्ते आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

BJP morcha nashik

नाशिक : भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नाशिक भाजप युवा मोर्चाच्या वतीने पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार निलंबनाचा नाशिकमध्ये निषेध; भाजप कार्यकर्ते आक्रमक

sakal_logo
By
केशव मते
आमदार निलंबन प्रकरणी  राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात येत आहे.

आमदार निलंबन प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात येत आहे.

नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाच्यावतीने पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पुतळा जप्त केला.

नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाच्यावतीने पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पुतळा जप्त केला.

जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. असा इशारा यावेळी देण्यात आला

जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. असा इशारा यावेळी देण्यात आला

महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन 12 आमदारांना निलंबित केले. 
तसेच विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे.

महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन 12 आमदारांना निलंबित केले. तसेच विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे.

loading image