नाशिक- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपच्या ‘१०० प्लस’ च्या मोहिमेत शिवसेनेचा अडसर निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रविवारी (ता. २९) जम्बो प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या शिवेसेनेच्या महत्त्वाकाक्षांना भाजपने ब्रेक लावला. माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचा शिंदे सेनेतील प्रवेश थांबविताना भाजपमध्ये त्यांना घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर हिरेंचा प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा गट मात्र सुखावला आहे.