कृत्रिम वीज टंचाई विरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP statewide agitation against artificial power shortage Nashik News

कृत्रिम वीज टंचाई विरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन

नाशिक : राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (NCP) तर ऊर्जा खाते कॉंग्रेसकडे (Congress) असल्याने दोन्ही खात्यांच्या मंत्र्यांमधील वाद व परस्परातील असमन्वयातून राज्यात मोठ्या प्रमाणात वीजेचे अघोषित भारनियमन (load shedding) सुरु असून याला सर्वस्वी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला. वीज टंचाई असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पटकरून सरकारने ग्राहकांना लुबाडणे सुरु केले असून त्या विरोधात भाजपच्या (BJP) वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्याची घोषणा त्यांनी केली.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. ते म्हणाले, वीज टंचाईच्या नावाखाली राज्य सरकारकडून ग्राहकांना लुबाडण्याचा डाव आहे. वीजटंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमन सुरू आहे. दीड ते सहा तासांपर्यंत वीज गायब असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने लुट सूरु कली आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन सुरु आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी आहे. कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात वीजनिर्मिती संयंत्रे सक्तीने बंद ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 'किसान क्रेडिट कार्ड'

सरकारच्या बेदरकार नितीमुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. विजेची मागणी कमी असते त्यावेळी देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. परंतू ऐन उन्हाळ्यात देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे. सरकारच्या आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप मागणीची देखल घेतली नाही. वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. भाजप सत्तेत असताना महाराष्ट्र भारनियमनमुक्त होता. कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडले जात आहे.

हेही वाचा: नाशिक : गोविंदनगर भागात रात्रीची 'घंटागाडी'

कमाल मागणीच्या तुलनेत सुमारे सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा असताना अन्य क्षेत्रातून जेमतेम १३०० मेगावॅट वीज खरेदी केली जात आहे. सरकारने खरेदी केलेल्या विजेचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याने राज्य सरकारची पत संपुष्टात आली आहे. थकबाकी वाढत असताना विशेष खाजगी पुरवठादारांशी हातमिळवणी करून चढ्या दराने वीज खरेदी करायची व त्याचा भार ग्राहकांच्या माथ्यावर मारून टक्केवारीचे राजकारण करायचे असा सरकारचा हेतू असल्याचा आरोप श्री. दरेकर यांनी केला. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devayani Farande), आमदार सिमा हिरे (Seema Hire), आमदार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale), डॉ. राहुल आहेर, भाजपच शहराध्यक्ष गिरीष पालवे आदी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले

- कोळशात भ्रष्टाचार होत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पत्र.

- मत्र्यांची आर्थिक परिस्थिती चांगली, रुग्णालयाची बिले भरावी.

- नवनीत राणा यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष घालावे.

- हनुमान चालीसा म्हणणे भाजपचे अभियान नाही.

- राज ठाकरेंच्या सभेला परवानगी आवश्यक, मुस्कटदाबी नको.

- ओवेसींच्या सभेला परवानगी राज ठाकरेंच्या का नाही?

- पोलखोल यात्रेवर दगडफेक प्रकरणात युवा सेनेचा सहभाग.

- स्थानिक आमदार पुत्रांवर संशय.

- बेताल वक्तव्यासाठी प्रसिध्द संजय राऊत यांनी कोर्टवर विश्वास ठेवावा.

- राऊतांनी आम्हाला रामभक्ती शिकवू नये.

Web Title: Bjp Statewide Agitation Against Artificial Power Shortage Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..