
विज तोडल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा भाजपचा इशारा
निफाड (जि. नाशिक) : सक्तीची वीज बील वसुली थांबवा... शेतकरी जगवा... असा एल्गार पुकारत भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या वतीने आक्रमक होत महाविकास अघाडी सरकार विरोधात शेतकरी बचाव धरणे आंदोलन (ता. २९) रोजी निफाड तहसील कचेरीवर करण्यात आले. यावेळी दिवाळीच्या काळात कुठलेही उत्पन्नाचे साधन नसताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. महावितरणने गांभीर्याने घेतले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून महावितरणला टाळे ठोकावे लागेल असा इशारा निफाड विधानसभा प्रमुख यतीन कदम यांनी दिला. त्यानंतर महावितरण आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
अगोदरच दोन वर्षापासुन लॉकडाऊन, अवेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना शेतकरी हितासाठी हे तिघाडी सरकार स्थापन करतोय असा आव आणलेल्या सरकारने ऐन दिवाळीत, द्राक्ष बागांची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंपाची लाईट कट करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून सुद्धा राज्य सरकार शेतकऱ्यांची वीज कापुन शेतकऱ्यांच्या घरात व जीवनात अंधार करायला निघाले आहे. तसेच अती अल्प नुकसान भरपाई देवुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे.
हेही वाचा: तुषार भोसलेंनी माफी न मागितल्यास शहरात फिरू देणार नाही : खैरे
त्वरित जोडणार तोडलेले कनेक्शन
भाजपा तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, निफाड विधानसभा प्रमुख यतीन कदम यांच्या मार्गदर्शखाली निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन स्विकारल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी आजच तोडलेले कनेक्शन जोडणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी संजय गाजरे, सतीष मोरे, बापुसाहेब पाटील, वैकुंठ पाटील, जगन कुटे, आदेश सानप, छोटू काका पानगव्हाणे, जनार्दन कराड, सचिन धारराव, लक्ष्मण निकम, पंढरीनाथ पीठे, दिलीप मंडलिक, मीनाताई बिडकर, सुरेखा कुशारे, सारिका डेरले शेतकरी बांधवांनी तसेच सर्व आघाड्या व मोर्चा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, गट व गण हे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा: लाकूड माफियांचे धाबे दणाणले; वनविभागाने केली सिनेस्टाईल कारवाई
Web Title: Bjp Warns To Lock Msedcl Office In Power Outage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..