वाघेरा घाटात काळ्या गरुडाचे दर्शन; जंगल परिपूर्ण असल्याचे संकेत

black eagle
black eagle Sakal
Summary

हरसूल- वाघेराचा परिसर निसर्गराजीने नटलेला आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे वृक्षराजी हिरवीकंच झाली असून, किलबिलाट वाढला आहे.

नाशिक : हरसूल- वाघेराचा परिसर निसर्गराजीने नटलेला आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे वृक्षराजी हिरवीकंच झाली असून, किलबिलाट वाढला आहे. या भागातील हरसूल- वाघेरा घाट नाशिक- हरसूलला जोडणारा मार्ग असून, घाटात अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. देशी-विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य परिसरात आहे. या घाटात काळा गरुड (black eagle) दृष्टिक्षेपात येतो. (black eagle has been spotted in harasul waghera area in nashik district)

नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावरील हा भाग आहे. काळा गरुड आकाराने घारीपेक्षा मोठा असून, काळसर वर्णाचा असतो. त्याचे पंख लंब-गोलाकार, पायाचा रंग पिवळा आणि चोच गर्द वर्णाची असते. नर-मादी दिसायला सारखे असले, तरी मादी मोठी असते. हे पक्षी हिवाळ्यात पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यात आढळतात. याशिवाय भूतान आणि अरुणाचल प्रदेश, तसेच ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडील पर्वत आणि कन्याकुमारी, श्रीलंकेकडील डोंगराळ भूप्रदेशात आढळतात. दक्षिणेकडे नोव्हेंबर ते मार्च या काळात आणि उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिलमध्ये दिसतात.

black eagle
नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

भारत आणि श्रीलंकामधील पूर्व आणि पश्चिम घाटांच्या जंगलात काळा गरुड आढळतो. दक्षिण आणि पूर्वेकडील गुजरातमधील जंगलात तो पाहायला मिळाला आहे. सस्तन प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करणारा हा पक्षी आहे. सर्व गरुडांप्रमाणेच तो अ‍ॅसिपीट्रिडा कुटुंबातील आहे. इक्टिनेटस या वंशाचा एकमेव सदस्य आहे. त्याची लांबी सुमारे ७५ सेंटीमीटर आणि पंखांचा आकार १४८ ते १८२ सेंटीमीटर असते. दक्षिण भारतातील एका अभ्यासानुसार उत्तम परिपूर्ण जंगलातच हा पक्षी आढळून येतो. हे क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास तो ते जंगल सोडून जात असल्याचे दिसून आले. या पक्ष्याचे आवडते खाद्य वटवाघूळ आणि खारुताई असून, छोटे पक्षी आणि अंडी तो खातो.

(black eagle has been spotted in harasul waghera area in nashik district)

black eagle
सावत्र आईने मुकबधीर लेकराला दिले गुप्तांगावर चटके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com