जुने नाशिक: महापालिका, तसेच इतर शासकीय कार्यालयासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी अनेकदा नागरिकांकडून गांधीगिरी मार्गाचा अवलंब केल्याचे अनेकदा बघायला मिळाले. परंतु नागरिकांकडून निर्माण करण्यात येणाऱ्या समस्येपासून मुक्तीसाठी चक्क महापालिकेकडून गांधीगिरी केल्याचे बघावयास मिळत आहे. महापालिका घनकचरा विभागाकडून पूर्व भागातील कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटची स्वच्छता करून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.