जळगाव : अखेरच्या दिवशी बोदवडमधील चार प्रभागांसाठी 25 अर्ज

जळगाव : अखेरच्या दिवशी बोदवडमधील चार प्रभागांसाठी 25 अर्ज

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण रद्द

बोदवड : येथील नगरपंचायतीसाठी (nagar panchayat maharashtra) १३ प्रभागांसाठी नुकतेच मतदान झाले असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण (obc reservation) रद्द असल्याने चार प्रभागांमध्ये सर्वसाधारण जागांवर निवडणूक घेतली जात आहे. यासाठी २९ डिसेंबरपासून अर्ज भरणे सुरू झाले होते. पहिल्या चार दिवसांत १० तर शेवटच्या दिवशी २५ अर्ज असे ३५ उमेदवारी (Candidacy) अर्ज दाखल झाले आहेत. यात काहींनी राजकीय पक्ष अथवा अपक्ष असे दोन अर्ज देखील दाखल केले आहेत. या चार प्रभागांसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले आहेत. तहसील कार्यालयात दुपारी तीनपर्यंत नामांकन दाखल करण्याची मुदत होती. यामुळे तहसील कार्यालयामध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले.

जळगाव : अखेरच्या दिवशी बोदवडमधील चार प्रभागांसाठी 25 अर्ज
महिलांमध्येही रुजतेय फिटनेसची क्रेझ

निवडणुकीसाठी १८ जानेवारीला मतदान पार पडणार असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दीत अर्ज दाखल करण्यात आले. अर्जांची छाननी मंगळवारी (ता. ४) होणार असून, माघार १० जानेवारीला आहे. ही निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून, या चार जागांवरच शिवसेना व राष्ट्रवादीचे सत्ता समीकरण अवलंबून असल्याने याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे. १८ जानेवारी २०२२ ला सकाळी साडेसातपासून मतदान होणार आहे तर १९ जानेवारीला तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

जळगाव : अखेरच्या दिवशी बोदवडमधील चार प्रभागांसाठी 25 अर्ज
नांदेड : अर्धवट सुविधा देणाऱ्या सुविधा केंद्रांची संख्या वाढली

या चार प्रभागांमध्ये अर्ज दाखल केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे -

  • प्रभाग क्रमांक २ : रेखा ढोले, संजय पाटील, कडूसिंग पाटील, महेंद्र पाटील, आश्विनी चौधरी, अकेश अग्रवाल, जीवन बिजारणे, काजल पाटील, संदीप तायडे, सचिन देवकर.

  • प्रभाग ३ : योगिता खेवलकर, शुभांगी मोरे, पूनम माळी, कविता जैन, विद्या शर्मा, अर्चना खेवलकर, सुजाता खेवलकर, सपना नानवानी.

  • प्रभाग १५ : शाह मुजम्मिल शहा मुजफ्फर, शेख मुस्तकीम इस्माईल, पिंजारी शेख तोफिक शेख अय्यूब, सचिन भोई,

  • प्रभाग १७ : फकिर रशिदाबी आलिमशहा, मोहिनी माळी, मीरा माळी, रूपाली माळी, सुशिलाबाई माळी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com