
शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात दहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लावणयात आले असून या कालावधीत आत्यवश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापणा आणि सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या लॉकडाउनदरम्यान नाशिक शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट असून, नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. ( police Blockade at 40 places in Nashik city tightening Corona restrictions)
पोलिस सूत्रांनी सांगितले, की शहरात ४० नाकाबंदी पाइंट लावले आहेत. ही संख्या मोठी असून, नाकाबंदी पॉइंटमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. यापूर्वी शहरात नाकाबंदी पॉइंट होते. मात्र, येथे नागरिकांना अडविण्यात येत नव्हते.
हेही वाचा: जेमतेम साठ्यामुळे नाशिकमध्ये लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ‘ब्रेक’
आपत्कालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी चौकशी, कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेण्यास सुरवात झाली. बुधवारी (ता. १२) दुपारी बारानंतर मात्र कोणतीही सूट मिळणार नाही. नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागणार आहे. वैद्यकीय कारण वगळता इतर सर्व कारणांसाठी फिरणे चुकीचे ठरणार असून, पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
( police Blockade at 40 places in Nashik city tightening Corona restrictions)
हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली
Web Title: Blockade At 40 Places In Nashik City Tightening Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..