esakal | जेमतेम साठ्यामुळे नाशिकमध्ये लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ‘ब्रेक’
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

जेमतेम साठ्यामुळे नाशिकमध्ये लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ‘ब्रेक’

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : दोन दिवसांपूर्वी प्राप्त झालेले पाच हजार ७०० कोव्हिशील्ड (Covishield) व कोव्हॅक्सिनचे (Covaxin) डोस संपुष्टात आल्याने शहरात लसीकरणाच्या (Vaccination) बाबतीत पुन्हा आणीबाणी निर्माण झाली असून, बुधवारी (ता. १२) उपलब्ध असलेला जेमतेम साठा संपुष्टात येणार असल्याने पुन्हा लसीकरणाच्या मोहिमेला ‘ब्रेक’ लागणार आहे. (Vaccination campaign in Nashik will have to be stopped again due to depletion of vaccine stock)

गेल्या आठवड्यात महापालिकेला साडेअकरा हजार लशींचे डोस प्राप्त झाले होते. गुरुवारी तो साठा संपल्यानंतर जिल्हा परिषदेकडून उसनवारी करून डोस मिळवावे लागले. त्यात राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू केल्याने लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी उसळली. त्यामुळे अनेक केंद्रांवर साठा संपुष्टात आल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले. कोव्हिशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा साठा कमी प्रमाणात असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांचे हाल झाले. शुक्रवारी पाच केंद्रांवर लसीकरण झाले. त्यानंतर मात्र शनिवार ते सोमवार असे तीन दिवस संपूर्ण लसीकरण बंद ठेवले होते. सोमवारी कोव्हिशील्डचे चार हजार ५३०, तर कोव्हॅक्सिनचे एक हजार २०० डोस महापालिकेला प्राप्त झाले. २९ केंद्रांवर सरासरी दोनशे लोकांना डोस दिल्यानंतर डोस संपुष्टात आले. बुधवारी दुपारपर्यंत जेमतेम लसीकरण चालेल, त्यानंतर मात्र पुन्हा लसीकरण बंद पडणार आहे

हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

शासनाच्या निर्णयाने दिलासा

राज्य शासनाने तूर्त १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण थांबविण्याचे आदेश देताना ४५ वयोगटापुढील नागरिकांना त्यातही दुसरा डोस असेल त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. आता महापालिकेकडे शिल्लक असलेल्या डोसपैकी दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

(Vaccination campaign in Nashik will have to be stopped again due to depletion of vaccine stock)

हेही वाचा: कठोर निर्बंधांची जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी