Indian Railway
sakal
नाशिक रोड: लोकोमोटिव्ह निर्मितीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताचा झेंडा फडकाविला आहे. बनारस येथील रेल्वे इंजिन कारखान्याने (बीएलडब्ल्यू) मोझांबिक देशासाठी सहावे स्वदेशी बनावटीचे ३३०० अश्वशक्तीचे एसी-एसी डिझेल-इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन यशस्वीरीत्या पाठविले आहे. रेल्वेला अशा दहा इंजिनांची ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली.