Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jetty constructed for boating in Godapatra in Ramwadi area.

Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी कंपनीकडून हाती घेण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट गोदा’ अंतर्गत येत्या मार्च महिन्यात अहिल्याबाई होळकर पूल ते रामवाडी पूल या दरम्यानच्या नदीपात्रात बोटिंग सुरू केली जाणार आहे.

त्यासाठी दोन्ही बाजूला जेट्टी तयार झाले असून, मार्च अखेरपर्यंत नाशिककरांसह स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना पर्यटनाची सोय उपलब्ध होईल. (Boating in river between Ramwadi bridge in March Jetty prepared on both sides Nashik News)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Dr. Amol Kolhe | शिवपुत्र संभाजी महानाट्याचा ‘तनिष्कां’नी करावा प्रचार- प्रसार : अमोल कोल्हे

स्मार्टसिटी कंपनीकडून ६३ कोटी रुपये खर्च करून प्रोजेक्ट गोदा हाती घेण्यात आला आहे. गोदावरी सौंदर्यीकरण करण्याबरोबर नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गोदावरी नदी स्नान करण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात, मात्र भाविकांना मनोरंजन व पर्यटनाचे साधन उपलब्ध व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होती.

त्याअनुषंगाने अहिल्यादेवी होळकर पूल ते रामवाडी पूल या दरम्यान बोटिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यःस्थितीत सुंदरनारायण मंदिराच्या खालच्या बाजूस व रामवाडीच्या बाजूने जेट्टी तयार करण्यात आलेल्या आहेत.

गंगापूर धरणाप्रमाणेच येथेही मेकॅनिकल साईजच्या बोटी सुरू केल्या जाणार आहे, अशी माहिती स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली. यापूर्वी अहिल्यादेवी होळकर पूल ते नवशा गणपती दरम्यान नदीपात्रातून प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तो निर्णय बारगळला आहे.

हेही वाचा: Nashik News : नाशिक, निफाड, सिन्नरमध्ये आवर्तनावेळी वीज खंडीत होणार!