Crime
sakal
नाशिक: बोधलेनगर येथील धात्रक पेट्रोल पंपावर संशयिताने शंभर रुपयाची फाटकी नोट घेतली नाही असे म्हणून हातात तलवार बाळगून गोंधळ घातला. त्याचवेळी रागाच्या भरात संशयिताने पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वार युवकाच्या डोक्यात त्यास ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केला. सुदैवाने दुचाकीस्वार युवकाच्या डोक्यात हेल्मेट असल्याने तो बचावला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन लक्ष्मण सोमवंशी (रा.बजरंग वाडी, नाशिक-पुणे रोड) अशी संशयिताचे नाव आहे.