Bogus Fertilizers Selling Ban: जिल्ह्यातील 18 विक्रेत्यांचे परवाने निलंबित; ZP कृषी विभागाची कारवाई

६८ विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश
Bogus Fertilizers Selling
Bogus Fertilizers Sellingesakal

Bogus Fertilizers Selling : जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत खते, बि -बियाणे, कीटकनाशक अशा एकूण २ हजार ८४३ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.

यात बोगस खत विक्री केल्याप्रकरणी ११ खते दुकाने व ७ कीटकनाशक दुकानांचा विक्री परवाना निलंबित करण्यात आला आहे.

तर, ५६ बियाणे विक्रेत्यांना व १२ खत विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (Bogus Fertilizers Selling Licenses of 18 sellers in district suspended Action of ZP Agriculture Department nashik news)


खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, वजने मापे निरीक्षक, कृषी अधिकारी पंचायत तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजने माप निरीक्षकांचा पथकात समावेश आहे.

तालुकास्तरावरील १५ तर, जिल्हास्तरीय १ अशा १६ भरारी पथके कृषीशी निगडित असणारी खते, बि-बियाणे, कीटकनाशक दुकानांची तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट व जिल्हा मोहीम अधिकारी अभिजित जमदाडे यांनी दिली.

आतापर्यंत जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या एकूण २९६० खत विक्रेत्यांपैकी ११०१ विक्रेत्यांची तपासण्या झाल्या आहेत. यात भरारी पथकाने ३५ खत विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या आहेत. यात ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.

१२ विक्रेत्यांना विक्रीबंदचे तर, ११ विक्रेत्यांचे परवाना निलंबित केले आहे. बियाणे विक्रेत्यांची एकूण नोंदणी ३२१० असून त्यापैकी १३४२ विक्रेत्यांची तपासणी झाली आहे. भरारी पथकाने ४९ विक्रेत्यांची नमुने तपासणीसाठी घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bogus Fertilizers Selling
Nashik ZP: आरोग्य केंद्रांना स्मार्ट टिव्ही बसविण्याचा घाट! जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून निधीची शोधाशोध

यात ५६ विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहे. ३१६४ कीटकनाशके विक्रेत्यांची नोंदणी झालेली असून यातील ४०० विक्रेत्यांची तपासणी झाली आहे. भरारी पथकाने ३३ कीटकनाशके विक्रेत्यांची तपासणी केली आहे.

यात एक नमुना अप्रमाणित आढळला आहे. ४ विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश तर, ७ विक्रेत्यांचे परवाना निलंबित केले आहे. संबंधित सर्व कंपन्यांना व खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. बोगस खत, बियाणे, कीटकनाशक विक्री संदर्भात शेतकऱ्यांची तक्रार असल्यास त्यांनी ७८२१०३२४०८ या तक्रार निवारण कक्षावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिरसाट यांनी केले आहे.

Bogus Fertilizers Selling
NMC News : कर न भरल्यास जुलैपासून 2 टक्के शास्ती; अडीच महिन्याच्या कालावधीत 77 कोटीची वसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com