Latest Marathi News | Bogus Medical Certificate Case : पगारे याचाही अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Medical Certificate case

Bogus Medical Certificate Case : पगारे याचाही अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी दाखल गुन्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड विभागाचे लिपिक किशोर पगारे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे पगारे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहेत. (Bogus Medical Certificate Case Pre arrest bail application for pagare also rejected Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Crime Update : शहरात 2 मुले, 3 मुलींचे अपहरण

नाशिक ग्रामीण पोलिसांत आंतरजिल्हा बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर केले. या प्रमाणपत्रांची पोलखोल झाल्याने या प्रकरणात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, जिल्हा रुग्णालयाचे लिफ्टमन कांतिलाल गांगुर्डे यांना अटक करण्यात आली होती, तर या प्रकरणी खासगी डॉक्टरांसह जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड विभागाच्या लिपिक किशोर पगारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पगारे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी (ता. २२) सुनावणी होऊन हा अर्ज नामंजूर करण्यात आला. यामुळे पगारे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास, डॉ. निखिल सैंदाणे यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा न्यायालयाने नामंजूर केले आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.

हेही वाचा: Nashik : शहरातील वाहतूक नियोजनासाठी समिती

Web Title: Bogus Medical Certificate Case Pre Arrest Bail Application For Pagare Also Rejected Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..