Bogus Shalarth ID Scam
sakal
नाशिक
Education News : नाशिक शिक्षण विभागात खळबळ: ७०० हून अधिक शिक्षक 'एसआयटी'च्या रडारवर!
Bogus Shalarth ID Scam Widens in Nashik District : जिल्ह्यात तब्बल सातशेहून अधिक शिक्षकांवर विशेष तपास पथकाची (एसआयटी) करडी नजर असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणावर चौकशी होण्याची शक्यता आहे.
नाशिक: बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, आता थेट शिक्षकांची नावे समोर येऊ लागली आहेत. जिल्ह्यात तब्बल सातशेहून अधिक शिक्षकांवर विशेष तपास पथकाची (एसआयटी) करडी नजर असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणावर चौकशी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दाखल झालेल्या सर्व तक्रारींची सखोल व गंभीर तपासणी केली जाणार आहे.
