esakal | नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ! तपास घेताच सत्य समोर

बोलून बातमी शोधा

Sakal - 2021-03-02T152303.388.jpg

कॉलेज रोडच्या रस्त्यावरील घटना उच्चभ्रू वस्तीत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली..आणि परिसरात खळबळ माजली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक देखील दाखल झाले. जेव्हा तपासणी केली तेव्हा सत्य समोर आले

नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ! तपास घेताच सत्य समोर
sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : कॉलेज रोडच्या रस्त्यावरील घटना उच्चभ्रू वस्तीत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली..आणि परिसरात खळबळ माजली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक देखील दाखल झाले. जेव्हा तपासणी केली तेव्हा सत्य समोर आले.

बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली..आणि परिसरात खळबळ माजली

नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड या भागांमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडली. ही वस्तू सापडली तेथे अनेक व्यापारी संकुलं आणि प्रतिष्ठितांचे बंगले असलेला हा परिसर आहे.  पोलिसांची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली तसेच बीडीडीएस पथक देखील पोचले आणि हा पूर्ण परिसर सील करण्यात आला होता. आणि त्यानंतर या बॉम्बसदृश वस्तूची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वेगळेच सत्य समोर आले. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

अखेर सत्य समोर

बॉम्बशोधक व नाशक पथकाने स्फोटक सदृश्य वस्तू नष्ट केल्यानंतर त्या खोट्यामधून एक प्लास्टिकचा लहान चेंडू आणि त्यामध्ये भरलेली फटाक्याची दारू आणि त्याला लावलेली वात अशा स्वरूपामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड या भागांमध्ये आढळून आल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचे धातू किंवा स्फोटक मिश्रित घटक नसल्याचा खुलासा बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केला आहे. त्यामुळे या स्फोटक सदृश्य वस्तूची एका फटाकेपेक्षा जास्त काही तीव्रता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांचा खुलासा

अशा प्रकारचे कृत्य कोणी केले याचा शोध आता पोलिस घेत आहेत. मात्र, हि वस्तू कोणाच्या हातात फुटली असती तर त्या व्यक्तीच्या हाताला इजा झाली असती. बाकी काही गंभीर परिणाम झाले नसते असे पोलीसांनी सांगितले. कचरा गोळा करणाऱ्यांना ही वस्तू सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच हे कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला.