esakal | लसीकरणासाठी चढाओढ! CoWIN ॲपवर काही मिनिटांतच बुकिंग फुल्ल

बोलून बातमी शोधा

cowin app
लसीकरणासाठी चढाओढ! CoWIN ॲपवर काही मिनिटांतच बुकिंग फुल्ल
sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोविडसाठी लसीकरण (covid vaccination) मोहीम सुरू असून, १ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले आहे. या गटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक असल्याने मोहिमेस चांगलीच गती आली आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग (Online booking) करताना स्पर्धा होत असून, संबंधित तारखेला लशींची संख्या उपलब्ध होताच काही मिनिटांच्या आत सर्व बुकिंग फुल होत असल्याचे चित्र आहे. ( covid vaccination online booking)

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी चढाओढ

कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तो रोखण्यासाठी शासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, साबणाने हात धुणे, मास्क लावणे आदींसोबतच लसीकरण करून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक, त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १ मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात झाली. यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील सर्वच नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी मात्र आधी ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करणे गरजेचे आहे. आता सर्वांनाच लसीकरणाचे महत्त्व पटलेले असून, निफाड तालुक्यात ऑनलाइन नोंदणी व बुकिंगसाठी सर्व नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या लिंक, ॲपवर लशीची उपलब्धता मिळताच अवघ्या काही मिनिटांच्या आत बुकिंग फुल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!

केंद्रे, लशी वाढविण्याची मागणी

निफाड तालुक्यात मोजक्याच केंद्रांवर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दररोज उपलब्ध होणाऱ्या लशीच्या साठ्याच्या तुलनेत नागरिकांची संख्या अधिक आहे. कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे निफाड तालुक्यात लसीकरण केंद्रे व लशींची उपलब्धता वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.( covid vaccination online booking)