esakal | देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!

बोलून बातमी शोधा

devendra fannavis nashik
देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!
sakal_logo
By
संदीप पवार

नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काही दिवसांपूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या (North Maharashtra) दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची (corona virus) स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला होता. त्यावेळी फडणवीसांनी नाशिकची परिस्थिती पाहता जे आश्वासन (promise) दिले होते, त्याची पूर्तता (ता.४) आज केली. (Devendra Fadnavis promise to Nashik fulfilled today)

महापौरांनी मानले आभार

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक पाहणी दौऱ्यात दिलेल्या आश्वासनानुसार आज (ता.४) जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन टँकर दाखल झाले आहे. याबद्दल महापौर सतीश कुलकर्णी यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करीत ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यासाठी निश्चितपणे मदत होईल असे सांगितले.

हेही वाचा: आरोग्य सांभाळा! नाशिकमध्ये चालता-बोलता होतायेत मृत्यू

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला होता.

- केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सीजन वर एमायडिसी वर इंजेक्शन मिळाले आहे त्यामुळे सर्वत्र समान वाटप झाले पाहिजे ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे त्याचे अधिक साठा मिळवा

-मंत्र्यांनी जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे हे खरे असले तरी मंत्र्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये

-जिंदाल कंपनीकडून एक तर रिलायन्स कंपनीकडून दोन ऑक्सिजनचे टॅंकर नाशिक साठी उपलब्ध करून देण्याचे फडणवीस यांचे आश्वासन

-राज्य सरकारने वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये जनतेच्या पाठीशी उभे राहावे या मताचा मी साधनांचा योग्य प्रमाणात वापर व्हावा

हेही वाचा: ''चमकोगिरी करणाऱ्या भाजपने समाजसेवा शिकवू नये'',शिवसेना, राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार!