Suicide News | १९ वर्षीय प्रियकराचा लग्नास नकार; केले आत्महत्येस प्रवृत्त! महिलेसह दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boyfriend Marriage suicide

१९ वर्षीय प्रियकराचा लग्नास नकार; केले आत्महत्येस प्रवृत्त! महिलेसह दोघांना अटक

नाशिक : प्रेमप्रकरणात लग्न करत नाही म्हणून युवकास आत्महत्येस प्रवृत्त करून आत्महत्येनंतरही पोलिसांना कळविण्याऐवजी मृतदेह मोकळ्या जागी फेकून दिल्याच्या प्रकरणाची अवघ्या २४ तासांत उकल करून आडगाव पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. या सर्वांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक सुभाष जाधव या वेळी उपस्थित होते. आडगाव शिवारातील नवव्या मैलाजवळ मोकळ्या जागेत २६ फेब्रुवारीला युवकाचा मृतदेह सापडला होता. गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्याने संशय बळावल्याने वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर व गुन्हे शोध पथकास तपासाचे निर्देश दिले. मृत युवक हा कंडारी कोळीवाडा, भुसावळ (जि. जळगाव) येथील रमेश रवींद्र मोरे (वय २५) असून, सध्या ओझरमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छाया गांगुर्डे या महिलेसोबत रमेशचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे तपास केला. त्यात छाया व रमेश यांच्यात एक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे, तसेच लग्नासाठी तगादा लावून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुढे आले. दरम्यान, छायाने मुलगा तुषार गांगुर्डे व त्याचा मित्र आकाश पवार यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारसायकलवर दोघांमध्ये मृतदेह बसलेल्या अवस्थेत ठेवून घटनास्थळी नेऊन टाकला. आडगाव पोलिसांनी यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलवून छाया रवींद्र गांगुर्डे (वय ४२), तुषार रवींद्र गांगुर्डे (वय १९, दोघेही रा. मिलिंदनगर, राजवाडा, ओझर मिग) व आकाश पवार (रा. तांबट गल्ली, मर्चंट बँकेसमोर, ओझर) यांना अटक केली आहे. उपनिरीक्षक जाधव, पाथरे, सहाय्यक उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, हवालदार सुरेश नरवडे, विजयकुमार सूर्यवंशी, वैभव परदेशी, देवानंद मोरे, नितीन शिंदे, तसेच तांत्रिक विश्‍लेषण शाखेचे सहायय्यक निरीक्षक बेडवाल यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :NashikmarriageArrested