Nashik News: मनमाड रेल्वेपूल बंद, दोन्ही बाजूच्या जनतेचीच गैरसोय; इकडून तिकडे जायचे तर पाच किमीचा वळसा

Barricades put up as the railway bridge embankment collapses, closing the bridge to traffic.
Barricades put up as the railway bridge embankment collapses, closing the bridge to traffic.

Nashik News: मनमाड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने शहरातील दोन्ही भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. जाण्यायेण्यास पर्यायी मार्गच नसल्याने पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे.

त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना डोकेदुखी झाली आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (Bridge on National Highway in Manmad city closed for traffic nashik news)

पुलाचा भराव कोसळल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचा फटका शहरातील दोन्ही भागातील नागरिकांना बसत असून आपले गाऱ्हाणे सांगावे तरी कोणाला अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुलावरून मोटारसायकल, सायकल, रिक्षा जाऊन दिल्या जात नसल्याने नागरिकांच्या जाण्यायेण्याची समस्या निर्माण झाली आहे. रोज पाच ते सहा किलोमीटरचा वळसा घालून वाहने घेऊन जावी लागत आहे.

सदर मार्गाने रिक्षाचे भाडे परवड नाही. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांना पेट्रोल परवड नाही. वृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून विविध कामांसाठी गावात येण्यासाठी रेल्वेचे दादरे ओलांडताना पायदुखी, गुडघेदुखी होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला शाळा आहेत. या मार्गावरील कॅम्प भागात संत बर्णबा विद्यालय, केंद्रीय विद्यालय, संत झेवियर्स विद्यालयासह इतर शाळा आहेत.

गावाच्या मध्यवर्ती भागात छत्रे विद्यालय, एच. ए. के हायस्कूल, गुड शेफर्ड स्कूल, इंडियन हायस्कूल, गुरू गोविंदसिंग हायस्कूल, केआरटी स्कूल, उर्दू हायस्कूल, नाईक हायस्कूल यासह इतर शाळा आहेत. त्यामुळे दोन्ही भागातील विद्यार्थी या वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेत असल्याने सकाळी जाण्यायेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Barricades put up as the railway bridge embankment collapses, closing the bridge to traffic.
World Disability Day 2023: दिव्यांग पंढरी महाराज देताहेत अध्यात्माचे शिक्षण!

पायी जाणारे, सायकलवर जाणारे विद्यार्थी काही दिवस शाळेतच गेले नाही. कोणत्या मार्गाने जावे असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला असून पर्यायी एकही मार्ग नसल्याने मोठी अडचण आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने यावर तोडगा काढून मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कॅम्पात पार्किंगसाठी जादा रक्कम

घरात लागणारा भाजीपाला, , किराणा सामान, दूध, दळण यासह इतर अत्यावश्यक साहित्य आणण्यासाठी महिलांना रेल्वे दादरा वरून पायपीट करावी लागत आहे. नोकरदारवर्ग, व्यापारी, प्रवासी, सर्वसामान्य नागरिकांना कॅम्प भागात गाड्या लावून पायी येऊन या भागात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या कॅम्प भागातील पार्किंगमध्ये गाड्या लावण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात असल्याचा आरोप गाडीधारकांनी केला आहे.

Barricades put up as the railway bridge embankment collapses, closing the bridge to traffic.
Nashik News: वाढलेली वाहतूक नियंत्रित करा; आमदार सुहास कांदे यांचे निर्देश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com