esakal | वणीत ऑक्सिजन प्लांटसाठी चाचपणी; नरहरी झिरवाळ यांची माहिती

बोलून बातमी शोधा

Vani Review meeting
वणीत ऑक्सिजन प्लांटसाठी चाचपणी; नरहरी झिरवाळ यांची माहिती
sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी, (जि. नाशिक) : परिसरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन प्लांट तयार करण्याबाबत चाचपणी सुरु आहे, अशी माहिती विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. येथील ग्रामपंचायत व पंचक्रोशित कोरोना रुग्णांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. १९) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

वणीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट?

ना. झिरवाळ यांनी परिस्थितीची संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत विविध सूचना केल्या. तसेच, कोविड सेंटरला ऑक्सिजनअभावी नवीन ३० बेडची रखडलेली सुविधा वणीकरांच्या मदतीतून पुढील दोन दिवसात कार्यान्वित होईल, असे आश्‍वासन दिले. वणीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार करता येईल का, जर हा प्लांट शक्य झाला तर वणीसह कळवण, सुरगाणा या तालुक्यातील सरकारी व खासगी हॉस्पिटलला पुरवठा करता येईल, असे माजी उपसरपंच विलास कड, मनोज शर्मा, महेद्र बोरा यांनी ना. झिरवाळ यांना सांगितले.

वणीतील आदिवासी मुला - मुलींचे होस्टेल स्वतंत्र विलिगीकरण कक्ष म्हणून सुरु करण्याबाबत मागणी केली गेली. वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल व त्यांचे सहकारी उत्कृष्ट कामगिरी बजावत असून, त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र बागुल, पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. साबळे, ग्रामसेवक संजय देशमुख, मंडळ अधिकारी ज्ञानेश्‍वर केसरे, व्यापारी महेंद्र बोरा, प्रकाश कड, विजू बर्डे, शरद महाले, प्रकाश बोरा, प्रकाश वाघ, सचिन देशमुख, मुकेश सिसोदिया, नामदेव पैठणे, सागर मोर आदी उपस्थित होते.